Bal Gandharva Rang Mandir | पुण्यात सिनेकलाकारांचं महाआरती करुन आंदोलन | Priya Berde | Sakal Media<br />आज पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात कलाकारांनी नाट्यगृह सुरु व्हावीत, या मागण्यासाठी आंदोलन केले. रंगकर्मींनी महाआरती करुन हे आंदोलन केले आहे. नटराजाच्या महाआरतीला सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि इतर कलाकार उपस्थित होते. १ सप्टेंबर पासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन मा. ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. सरकारच्या या आश्वासनावर रंगकर्मींचा विश्वास आहे, मंत्री महोदयांनी दिलेले आश्वासन पाळावे आणि नाटक व सिनेमाचा पडदा १ सप्टेंबरलाच उघडावा, यासाठी ही महाआरती करण्यात आली आहे.<br />#Pune #BalGandharvaRangMandir #priyaBerde #Actor #Actress #Andolan